बंगळुरुच्या चेंगराचेंगरीत 20 वर्षाच्या भौमिक लक्ष्मणचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर जेव्हा अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा त्याचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी त्याचे वडील धाय मोकलून रडू लागले. या पित्याचा आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटले. आपल्या अवघ्या 20 वर्षांच्या मुलाला हा बापाने गमावलंय. मुलाचे अंत्यसंस्कार करताना या बापाला अश्रू अनावर झाले आणि तो धाय मोकलून रडू लागला. एका वडिलांसाठी सर्वात मोठं दु:ख म्हणजे स्वत:च्या मुलावर अंत्यसंस्कार करणं. या वडिलांच्या वाट्याला ते दु:ख आलंय. बंगळुरुतील रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुच्या विजयी रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. त्यात बंगळुरुच्या हसन जिल्ह्यातील भौमिकचाही मृत्यू झाला.भौमिकच्या मृत्यूमुळे त्याच्या वडिलांना धक्का बसलाय. हसन जिल्ह्यातील बेलूरमधील कप्पागोडे गावात भौमिकला दफन करण्यात आलं. यावेळी भौमिकच्या कबरीला मिठी मारून त्याचे वडिल ढसाढसा रडले.