spot_img
spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिनानिमित्त पुण्यात ‘शक्ती’ प्रदर्शन!

पक्षात फूट पडल्यावर महायुतीत सहभागी होणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 10 जूनला होणार्‍या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्धापन दिनाचा सोहळा भव्यदिव्य केला जाणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.

बालेवाडी येथे होणार्‍या कार्यक्रमस्थळाची सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

या वेळी त्यांनी वर्धापनदिनाच्या सोहळ्याची माहिती दिली. या प्रसंगी पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, शिवाजी गर्जे, सुरेश घुले, पुणे शहर (पूर्व) विभागाचे अध्यक्ष सुनील टिंगरे, पश्चिम विभागाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, पक्षाचे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते..

Epaper Website

Related Articles

भोगवटाधारक स्वतः या खात्याचे वनमंत्री असल्याने कारवाईला विलंब, नागरिकात अधिकाऱ्याच्या कारवाई बाबत तीव्र नाराजी

नवी मुंबई / प्रतिनीधी महाराष्ट्र खाजगी वने अधिनियमातील तरतुदी नुसार वने विभागाची जमीन कवडीमोल भाड्याने दिलेल्या जमिनीची निःपक्षपाती चौकशी होवून कारवाई करण्याची मागणी पत्रकार जनसेवक...

मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत ‘अक्षम्य’ चुका, शिवसैनिकांचा संताप अनावर!

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत अक्षम्य चुका आढळून आल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पददेखिल...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!